नमस्कार,
'स्टर्लिंग सिस्टिम्स' या आयटी कंपनीच्या माध्यमातून आम्ही माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गेली 10 वर्षाहून अधिक काळ कार्यरत आहोत. विविध क्षेत्रांमध्ये उपयुक्त असणारी सॉफ्टवेअर निर्मिती व त्यामध्ये सेवा देणे हे आमचे प्रमुख काम. 'विविध डोमेन्स मध्ये गेली अनेक वर्ष आम्ही काम करीत आहोत.
त्यातलाच एक महत्वपूर्ण डोमेन म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा चपखल वापर !
याच अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने 'पॉलिटिकल अॅडव्होकेसीच्या क्षेत्रातही गेली अनेक वर्षे आम्ही काम करीत आहोत. राजकीय व सामाजिक
घडामोडींचे तज्ज्ञ व तंत्रज्ञ आमच्या टीमचा भाग बनून काम करत आहेत.
सातारा लोकसभा पोटनिवडणूकीत आमची संपूर्ण टिम
आदरणीय खासदार श्रीनिवास पाटील साहेबांसाठी काम करीत होती. अचानक उमेदवारी जाहीर झाली आणि लगेचच काम सुरु करावे लागले. प्रत्येक दिवशीची रुपरेखा आखून त्याची तंतोतंत अंमलबजावणी करण्याचा
सारंग श्रीनिवास पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रयत्न केला. त्याचे सर्वांनाच उत्तम परिणाम देखील पाहायला मिळाले.
जाणिवपूर्वक नमूद करण्याची बाब म्हणजे सातारा येथील त्या पावसातील ऐतिहासिक सभेच्या ठिकाणी देखील आमची एक टिम उपस्थित होती. या सभेचा क्षण ना क्षण आम्ही अनुभवला. सोशल माध्यमात उमटलेले त्याचे पडसाद टिपताना आमची संपूर्ण टिम अक्षरशः रात्रभर जागी होती.
ही सभा सर्वार्थाने ऐतिहासिक होती. तिचे महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनातील महत्त्व अनन्य साधारण आहे. सोशल मिडियात जनतेच्या भावनांचे उमटलेले चित्र अभूतपूर्व जरी असले तरी त्याचे तिथेच कायमस्वरूपी जतन होणं तसं अवघड आहे. कारण सोशल मिडियाची गणितं अल्गोरिदम वर चालतात. त्या त्या काळातील सर्वाधिक चर्चेचा विषय आपोआप पुढे येतो आणि जुना विषय मागे पडतो. त्यामुळे या सभेचे मुद्रित माध्यमात परंतु सोशल मिडियाच्या लूकमध्ये कायमस्वरुपी दस्तावेजीकरण करण्याचा आम्ही निर्धार केला. याला ज्येष्ठ पत्रकार चत्रवीर भद्रेश्वरमठ व गिरीश लता पंढरीनाथ यांनी मूर्तरूप दिले. तब्बल वर्षभराच्या मेहनतीनंतर साताऱ्याच्या त्या ऐतिहासिक सभेचा हा महत्त्वपूर्ण दस्तावेज म्हणजे
'#पावसातलासह्याद्री शरद पवार'' हे पुस्तक तयार झाले असून ते आपल्या हाती सोपविताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या पुस्तकात सोशल मिडियावर उमटलेल्या प्रतिक्रियांचे उत्तम असे संकलन आहेच याशिवाय
राज्यभरातील लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांचे वाचनीय असे लेख देखील आहेत.
स्वतः खासदार श्रीनिवास पाटील साहेबांची उत्तम अशी प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे.
खासदार सुप्रियाताई सुळे यांचाही माझे बाबा हा अतिशय वाचनीय असा लेख या पुस्तकात समाविष्ट आहे.
वाचकांसाठी हे पुस्तक आता अॅमेझॉन व फ्लिपकार्ट या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीला वाचकांचा भरघोस असा प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे पहिल्या आवृत्तीतील अगदी मोजक्याच प्रती सध्या उपलब्ध आहेत. वाचकांची मागणी अक्षरशः दर तासाला वाढतच असून तरीही
सर्वांना पुस्तक मिळेल याची ग्वाही आम्ही देतो.
जर एखादे वेळेस हे पुस्तक ऑनलाइन उपलब्ध नसल्याचे दाखवित असले तरी निराश होऊ नका. आम्ही ते तुमच्यासाठी लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याचा अवश्य प्रयत्न करु. याशिवाय जर कुणाला जास्त प्रमाणात प्रती हव्या असतील तर त्यांनी थेट संपर्क साधावा ही विनंती.